फ्रंट रनिंग आणि इनसाईडर ट्रेडिंग

Share

फंड हाऊसकडून विक्रीची ऑर्डर असेल तेव्हा ही ऑर्डर टाकण्यापूर्वी स्वतःची शॉर्ट सेल म्हणजेच विक्रीची ऑर्डर टाकून म्युच्युअल फंडची विक्री ऑर्डर टाकायची त्याचा परिणाम म्हणून भाव खाली आल्यावर खरेदी करून आपली पोझिशन स्क्वेअरअप करायची? कोणत्याही अंतर्गत माहितीचा स्वतःच्या फायद्यासाठी असा वापर करणे यास इनसायडर ट्रेडिंग म्हणतात हा शब्दही आपल्या कानावर आला असेल. यामुळे लोकांचा बाजारावरील विश्वास कमी होतो त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांची मागणी कमी होऊ शकते, जे अंतिमतः या व्यवसायासाठी हानिकारक आहे.

उदय पिंगळे – मुंबई ग्राहक पंचायत

क्वांट म्युच्युअल फंड हा मागील तीन वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणारा अलीकडील काही वर्षांपूर्वी उदयास आलेला म्युच्युअल फंड आहे. जानेवारी २०२० मध्ये त्याच्याकडे असलेली मालमत्ता २५८ कोटी रुपये होती. सध्या त्याच्याकडून २७ योजना चालवल्या जात असून त्यातील २१ योजना शेअर्सशी संबंधित आहेत. फंडाकडे असलेली एकूण मालमत्ता जून २०२४ मध्ये ती ९०००० कोटींहून अधिक आहे. त्याच्या मालमत्तेत झालेली वाढ आणि त्यावर मिळवलेला परतावा अचंबित करणारा आहे. साहजिकच सर्व गुंतवणूकदारांच्या नजरेत हे उत्कृष्ट फंड हाऊस आहे. त्यांच्या मुंबई आणि हैदराबाद येथील कार्यालयावर फ्रंट रनिंगच्या संशयावरून सेबीने धाडी टाकल्या. या धाडी सेबीच्या नियमित तपासणीचा भाग नसून न्यायालयाच्या पूर्वपरवानगी मिळवून टाकण्यात आल्या. यापूर्वी एक्सिस म्युच्युअल फंडावर फ्रंट रनिंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. त्याची चौकशी पूर्ण होऊन एक्सिस फंडाचे माजी मुख्य डीलर विरेश जोशी आणि अन्य वीस जणांवर भांडवल बाजारात व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली. फंडाकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खरेदी-विक्री निर्णयामुळे बाजारभावावर प्रभाव पाडू शकणाऱ्या माहितीचा ब्रोकर्स, डीलर्स यांसारख्या मार्केट मध्यस्थाकडून दुरुपयोग करून त्यातून स्वतः नफा मिळवण्याची ही पद्धती आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यास फ्रंट रनिंग असे म्हटले जाते. या सर्व व्यवहारात गुंतवणूक केलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अप्रत्यक्षपणे खरेदी-विक्रीचा म्हणजेच खरेदी जास्त दराने आणि विक्री कमी दराने करावी लागते. त्यांना योग्य दर न मिळाल्याने त्याचे अप्रत्यक्षपणे नुकसान होते.

फ्रंट रनिंग कसे काम करते?

म्युच्युअल फंडाकडून शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. ही ऑर्डर्स ठरावीकच ब्रोकर्स/डीलर्सना यांच्याकडे येत असल्याने त्यांना ही बातमी आधी माहिती असते. बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी झाली तर पुरवठा कमी पडल्याने त्या शेअर्सचा भाव वाढतो, याउलट विक्री झाल्यास पुरवठा वाढल्याने शेअर्सचे भाव खाली येतात. दरम्यान आलेली ऑर्डर टाकण्यापूर्वी मिनिटभर आधी ते आपल्या ऑर्डर्स टाकून ठेवतात म्हणजे खरेदीची ऑर्डर असेल तर स्वतःची खरेदी ऑर्डर आधी टाकून कन्फर्म करायची आणि नंतर फंड हाऊसची ऑर्डर टाकायची, त्याचा प्रभाव पडून भाव वाढल्यावर आपण खरेदी केलेले शेअर्स विकून पोझिशन रिव्हर्स करायची आणि नफा खिशात टाकायचा. जेव्हा फंड हाऊसकडून विक्रीची ऑर्डर असेल तेव्हा ही ऑर्डर टाकण्यापूर्वी स्वतःची शॉर्ट सेल म्हणजेच विक्रीची ऑर्डर टाकून म्युच्युअल फंडची विक्री ऑर्डर टाकायची. त्याचा परिणाम म्हणून भाव खाली आल्यावर खरेदी करून आपली पोझिशन स्क्वेअरअप करायची? कोणत्याही अंतर्गत माहितीचा स्वतःच्या फायद्यासाठी असा वापर करणे यास इनसायडर ट्रेडिंग म्हणतात. हा शब्दही आपल्या कानावर आला असेल. यामुळे लोकांचा बाजारावरील विश्वास कमी होतो. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांची मागणी कमी होऊ शकते, जे अंतिमतः या व्यवसायासाठी हानिकारक आहे.

इनसायडर ट्रेडिंगपेक्षा फ्रंट रनिंग वेगळे कसे?

फ्रंट रनिंग करणाऱ्यास फंड हाऊसकडून कोणत्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाईल एवढीच माहिती असते. त्याला कंपनी संदर्भात अन्य कोणत्याही गोष्टीची माहिती नसते. कंपनीच्या संबंधातील मुख्य निर्णय घेणाऱ्या व्यक्ती, संचालक, कच्या मालाचे पुरवठादार, मुख्य विक्रेते यांना काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी आधीच माहिती असते. या माहितीत शेअर्सच्या बाजारभावावर परिमाण करू शकणाऱ्या अनेक बाबींचा समावेश होईल-

  • कंपनीच्या नफ्यामध्ये झालेली वाढ किंवा घट
  • कंपनीचे दुसऱ्या कंपनीत होऊ घातलेले विलीनीकरण.
  • कंपनी दुसरी कंपनी ताब्यात घेत असण्याचे प्रयत्न.
  • व्यवसाय विस्तारीकरण योजना.
  • कंपनी घेत असलेले मोठे कर्ज त्यासाठी उपलब्ध करून दिलेले तारण.
  • तारण विरहित कर्जाची उभारणी.
  • परकीय भांडवली गुंतवणूक.
  • असलेला व्यवसाय बंद करून नवीन व्यवसाय सुरू करण्याचे प्रयत्न.
  • बोनस, राईटस, डिव्हिडंड देणे, शेअर्सचे विभाजन करणे यांसारखे कॉर्पोरेट इव्हेंट.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या गोष्टी जेव्हा कंपनी जाहीर करेल तेव्हाच माहिती होते. यातील काही गोष्टी ताबडतोब जाहीर करणे कायद्यानुसार आवश्यक आहे. त्यास भागधारकांची मान्यता मिळवणे आवश्यक असते. अशी माहिती जाहीर करण्यापूर्वीच्या काळात या माहितीचा बाजारभावावर काय प्रभाव पडेल याचा विचार करून स्वतः, नातेवाईक, मित्रमंडळ किंवा दुसऱ्याच्या नावे गुंतवणूक करून लाभ मिळवणे यास इनसायडर ट्रेडिंग असे म्हटले जाते.

फ्रंट रनिंगचा गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम –

फ्रंट रनिंग कसे केले जाते आणि मध्यस्थांकडून अल्प मुदतीत अल्प भांडवलात मोठा नफा कसा मिळवला जातो ते आपण पाहिले. हे टाळले असते तर फंड हाऊसला अधिक योग्य भाव मिळाला असता. ही गुंतवणूक सर्वसामान्य गुंतवणूकदारांची असल्याने त्यांना योग्य नफा मिळत नाही. त्यामुळे ते गुंतवणूक करीत राहण्याची शक्यता कमी होते. गुंतवणूकदारच नसतील तर योग्य भाव बाजार शोधू शकणार नाही. बाजारात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती ते अल्प, मध्यम, दीर्घ गुंतवणूकदार असोत, जुगारी असोत, डे ट्रेडर्स किंवा डिरिव्हेटिवमध्ये व्यवहार करणारे असोत हे सर्वजण व्यवहार करीत असल्याने बाजार सातत्याने हलता राहतो. त्यातून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याच्या विविध संधी प्राप्त होतात. फ्रंट रनिंग आणि इनसायडर ट्रेडिंगमुळे त्यास बाधा पोहोचते. इतर देशातील गुंतवणूकदार आणि भारतीय गुंतवणूकदार यातील महत्त्वाचा फरक म्हणजे येथील प्रत्यक्ष गुंतवणूक ही शेअर बाजारात थेट गुंतवणूक कॅश आणि ऑपशन्स व्यवहारात केली जाते, तर अप्रत्यक्ष गुंतवणूक म्युच्युअल फंडामार्फत केली जाते. परदेशात आपल्या तुलनेने थेट गुंतवणूक वैयक्तिकरीत्या केली न जाता वेगवेगळ्या माध्यस्थांमार्फत विविध फंड, इटीएफ, रिटस, इनव्हीट यांसारख्या आधुनिक प्रकारात केली जाते.

mgpshikshan@gmail.com

Tags: mutual fund

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

38 minutes ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

1 hour ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

2 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

2 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

2 hours ago