Friday, June 20, 2025

जगातील कोणत्या देशात आहे सर्वाधिक कॅन्सरची संख्या, भारत या स्थानावर

जगातील कोणत्या देशात आहे सर्वाधिक कॅन्सरची संख्या, भारत या स्थानावर

मुंबई: कॅन्सर भारतासह संपूर्ण जगात दरवर्षी लाखो करोडो लोकांचा बळी घेतो. वर्ल्ड कॅन्सर रिचर्च फंड आंतरराष्ट्रीयच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक कॅन्सरचे प्रमाण चीनमध्ये आहे. येथे ४८ लाख लोकांना कॅन्सर आहे. तर दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचा नंबर लागतो. येथे २३ लाख लोक कॅन्सरचे शिकार आहे. तर तिसऱ्या स्थानावर भारत आहे. भारतात १४ लाखाहून अधिक लोकांना कॅन्सर आहे.



भारतातील कॅन्सरची प्रकरणे


भारतात कॅन्सरच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात दरवर्षी साधारण १० लाखाहून अधिक प्रकरणे समोर येतात. ही संख्या सातत्याने वाढत आहे. पूर्वोत्तर भारतातील राज्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. यात खासकरून मिझोरम, अरूणाचल प्रदेश आणि नागालँड यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये तंबाखूचा अधिक वापर आणि अनिवंशिक कारणामुळे कॅन्सरच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.



कॅन्सरमुळे मृत्यू


WHOच्या रिपोर्टनुसार २०२२ या वर्षात भारतात साधारण १४ लाख कॅन्सरची प्रकरणे समोर आली होती. तर कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पावलेल्यांची संख्या ९.१ लाख होती. यातील मोठी संख्या ब्रेस्ट कॅन्सर होती. तर पुरुषांमध्ये ओरल कॅव्हिटी कॅन्सर, लिप कॅन्सर आणि लंग कॅन्सर यांची प्रकरणे अधिक होती.

Comments
Add Comment