Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीPune PET Exam : महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा...

Pune PET Exam : महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली!

नवीन तारीखही केली जाहीर

पुणे : कोलकाता, बदलापूर आणि राज्यात इतर ठिकाणी घडलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट रोजी होणारी पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत (Savitribai Phule Pune University) २४ ऑगस्ट रोजी पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा होणार होती. मात्र २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. प्रसारमाध्यमात त्या संदर्भातील बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब अथवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवीन तारीख केली जाहीर

पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २४ ऑगस्ट ऐवजी आता ३१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. PET परीक्षेचे (PhD admission PET exam) सुधारीत प्रवेशपत्र लवकरच विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पेट परीक्षेच्या इतर कोणत्याही बाबींमध्ये बदल होणार नसल्याचे शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -