Thursday, October 30, 2025
Happy Diwali

पंतप्रधान मोदी विमानाने नव्हे तर ट्रेनने जाणार युक्रेनला, जाणून घ्या कारण

पंतप्रधान मोदी विमानाने नव्हे तर ट्रेनने जाणार युक्रेनला, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंड दौऱ्यावर आहेत. पोलंडनंतर आता पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला सरळ युक्रेनला जाणार आहेत. मात्र युक्रेनला ते विमानाने नव्हे तर रेल्वेने जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडवरून युक्रेनचा दौरा एका स्पेशल रेल्वेने करणार आहेत. ही रेल्वे काही सामान्य नाही. यात लक्झरी सुविधा आणि वर्ल्ड क्लास सर्व्हिससाठी ओळखली जाते. या स्पेशल रेल्वेला ट्रेन फोर्स वन या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे युक्रेनची राजधानी कीवमध्ये ७ तास घालवण्यासाठी पंतप्रधान मोदी २० तासांचा प्रवास ट्रेन फोर्स वनने करणार आहेत.

पंतप्रधान मोदी पोलंडवरून युक्रेनचा प्रवास रात्रीचा करणार आहे. पोलंडवरून युक्रेनची राजधानी कीवचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष ट्रेनने २० तासांत करतील. ते कीवमध्ये ७ सात घालवतील. मात्र त्यासाठी ते २० तासांचा प्रवास करून जाणार आहेत. आता सवाल हा आहे की पंतप्रधान मोदींनी विमानाच्या ऐवजी रेल्वेचा प्रवास का निवडला. याचे सरळ उत्तर आहे ते म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध. रशियासोबत युद्धामुळे युक्रेनमधील एअरपोर्ट बंद आहेत. युक्रेनचे रस्ते धोकादायक असल्याने सध्याच्या काळात केवळ रेल्वेनेच प्रवास सुरक्षित मानला जात आहे.

पंतप्रधान मोदी कधी जाणार युक्रेनला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच २२ ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी उशिरा स्पेशल ट्रेनने युक्रेनची राजधानी कीवसाठी रवाना होतील. पंतप्रधान मोदी ७ तास राजधानी कीवमध्ये घालवतील. या दरम्यान, पंतप्रधान मोदी राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट घेतील. या दरम्यान भारत-युक्रेन यांच्यातील महत्त्वाच्या संरक्षणविषयक व्यवहारावर स्वाक्षऱ्या होतील.

मोदींआधी कोणी केलाय हा प्रवास?

पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेने प्रवास करणारे एकमेव व्यक्ती नाहीत. पंतप्रधान मोदींच्या आधी जगातील अनेक दिग्गजांनी युक्रेन-रशिया युद्धात या रेल्वेने प्रवास केला आहे. पंतप्रधान मोदींआधी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनीही या रेल्वेतून प्रवास केला आहे. २०२२मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅको, जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज आणि इटलीचे तत्कालीन पंतप्रधान मारियो ड्रागी यांनी या स्पेशल रेल्वेने प्रवास केला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >