Monday, September 15, 2025

Ind Vs Eng: ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामने खेळणार टीम इंडिया, वेळापत्रक जाहीर

Ind Vs Eng: ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामने खेळणार टीम इंडिया, वेळापत्रक जाहीर
मुंबई: भारतीय संघ पुढील वर्षी जून-ऑगस्ट दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. येथे ते यजमान संघाविरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार आहेत. या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. गुरूवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तसेच इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक जारी केले.

हेडिंग्लेमध्ये खेळवली जाणार पहिली कसोटी

वेळापत्रकानुसार दोन्ही देशांदरम्यानचा पहिला कसोटी सामना २० जूनपासून हेडिंग्लेमध्ये होणार आहे. त्यानंतर बर्मिंगहममध्ये २ जुलैपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. यानंतर दोन्ही संघ लॉर्ड्सच्या मैदानावर १० जुलैपासून मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आमने-सामने होतील. त्यानंतर मँचेस्टर ला २३ जुलैपासून आणि ओव्हलच्या मैदानात ३१ जुलैपासून कसोटी सामने खेळवले जातील. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या सत्राचा भाग असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्राची फायनल जून २०२५मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. या फायनल सामन्याच्या काही दिवसांनीच ही पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारतीय संघ शेवटचा कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी २०२१मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता.ही मालिका २-२ अशी बरोबरीत संपली होती. दरम्यान, कोविडच्या प्रकोपामुळे या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना २०२२मध्ये झाला होता. हा सामना इंग्लंडने सात विकेटनी जिंकला होता.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

२०-२४ जून, पहिला कसोटी सामना, हेडिंग्ले २-६ जुलै, दुसरा कसोटी सामना, बर्मिंगहॅम १०-१४ जुलै, तिसरा कसोटी सामना, लॉर्ड्स २३-२७ जुलै, चौथा कसोटी सामना, मँचेस्टर ३१ जुलै - ४ ऑगस्ट, पाचवा कसोटी सामना, द ओवल
Comments
Add Comment