Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजहौशे, गौशे, नौश्यांना बळी पडू नका; ‘लाडकी बहीण योजने’च्या टीकेवरुन अजितदादांनी विरोधकांना...

हौशे, गौशे, नौश्यांना बळी पडू नका; ‘लाडकी बहीण योजने’च्या टीकेवरुन अजितदादांनी विरोधकांना फटकारले!

कोल्हापूर : हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरोधकांवर कडाडले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेचा अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. महायुतीचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा आज कोल्हापुरात पार पडला. या मेळाव्यादरम्यान अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, महायुतीचे सरकार काम करणारे सरकार असून वेळकाढूपणा करणारे सरकार नाही, हौशे, गौशे, नौशे बोलतात की पैसे परत काढून घेतील विरोधकांची ही थाप असून जनतेला दिलेले पैसे कोणताच माय का लाल काढून घेऊ शकत नाही, तरीही विरोधक गैरसमज करीत आहेत. सरकारबद्दल अविश्वास निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. विरोधकांच्या या गोष्टीला बळी पडू नका, असे अजित पवार म्हणाले.

तसेच पुढील काळात अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येणार आहेत. विरोधक नेते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भडकवत आहेत. विरोधक म्हणतात की हे सरकार होऊ देत नाही पण सरकार का होऊ देणार नाही. एमपीएससी ही एक स्वायत्ता संस्था आहे. यामध्ये सरकार लक्ष घालू शकत नाही. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यामध्ये लक्ष घातले आहे. आता एकाच दिवशी आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीकडून घेण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुका पुढील काही महिन्यांत पार पडणार आहेत. निवडणुका जवळ यायला लागल्या की विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय. सरकार चालवताना आम्ही महिला, शेतकरी, वारकरी, युवक, समाजातील सर्व घटकांसाठी योजना आणल्या आहेत, कोणालाही वंचित ठेवले नाही, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे, विरोधक सतत सरकारच्या विरोधात प्रयत्न करीत असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

दरम्यान, महायुतीच्या माध्यमातून राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा सुरु आहे. काल नाशिक, बीडनंतर आज कोल्हापुरात पार पडला. यावेळी बोलताना ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यांत अर्ज दाखल केले आहेत. अशा महिलांना जुलैपासून महिन्याला पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -