मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएममधून फ्रीमध्ये पैसे काढण्यासाठी मर्यादा ठरवली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक ट्रान्झॅक्शनवर बँकेकडून फी वसूल केली जाते.
मर्यादेपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन झाल्यास पुढील प्रत्येक वेळेस पैसे काढण्यावर २१ रूपये शुल्क लावले जाते.
१ जानेवारी २०२२ पासून नवे शुल्क लागू लागू करण्यात आले आहे.
ग्राहक दर महिन्याला आपल्या बँकेच्या एटीएममधून ५ वेळा पैसे काढू शकतात.
दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची ही मर्यादा ३ वेळा आहे.
बिगर मेट्रो शहरात ग्राहक दुसऱ्या एटीएममधून ५ वेळा पैसे काढू शकतात.
नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर बँकेकडून ६ रूपयांचे शुल्क लावले जाते.
याशिवाय प्रत्येक दिवशीही पैसे काढण्याची मर्यादाही ठरवण्यात आली आहे.