मुंबई: जगभरात कॉफी चेन चालवणारी कंपनी स्टारबक्सने नुकतेच भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांना हटवून ब्रायन निकोल यांना सीईओपदी नियुक्त केले होते. आता ही माहिती समोर आली आहे की ब्रायन निकोल ऑफिस येण्या-जाण्यासाठी सिएटल ते कॅलिफोर्निया असा प्रवास करणार आहेत
या दोन्ही शहरादरम्यानचा १६०० किमीचा प्रवास करण्यासाठी ते प्रायव्हेट जेटचा वापर करतील. या पद्धतीने ते दररोज ऑफिस येण्याजाण्यासाठी लाखो रूपये खर्च करतील. स्टारबक्सकडून आपल्या सीईओसाठी करण्यात आलेल्या या व्यवस्थेबाबत संपूर्ण जग हैराण आहे.
आठवड्यातून ३ दिवस कंपनीच्या सिएटल स्थित हेडक्वार्टरमधून काम करणार ब्रायन निकोल
स्टारबक्सची हायब्रिड वर्क पॉलिसीनुसार, ब्रायन निकोल आठवड्यातून ३ दिवस सिएटल स्थित हेडक्वार्टरमधून काम करावे लागेल. दरम्यान, त्यांचे घर कॅलिफोर्नियामध्ये आहे त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी ३ दिवस त्यांना ये जा करावे लागेल. गदरम्यान, कंपनीने त्यांच्या ऑफर लेटरमध्ये प्रायव्हेट जेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्टारबक्समध्ये ही हायब्रिड वर्क पॉलिसी २०२३पासून लागू आहे. ५० वर्षीय सीईओ ब्रायन निकोल यांच्याकडून कंपनीला खूप अपेक्षा आहेत. त्यांनी चिपोटले मेक्सिकन ग्रिल सीईओ असताना कंपनीला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्याच्या नेतृत्वात कंपनीच्या स्टॉक्सने जबरदस्त उसळी घेतली होती.