Thursday, June 19, 2025

Pune News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात ठिय्या आंदोलन!

Pune News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुण्यात ठिय्या आंदोलन!

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी मंगळवारी रात्री शास्त्री रस्ता येथे आंदोलन केले. नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी या वेळी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.


एमपीएससीतर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होत आहे. कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे. मात्र या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एमपीएससीकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही. आता या परीक्षेची तयारी झाली असून, कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले.


या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा