न्यायालयावर खुर्ची लावून संजय राऊत सारख्या माकडाला बसवा
आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई : बदलापुरमध्ये (Badlapur Crime) काल जो काही विकृत प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व प्रतिनिधी सरकार काल अॅक्शन मोडवर गेला आहे. महायुती (Mahayuti) सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अॅक्शन घ्यायला सुरु केली. यातच एकीकडे एसआयटी स्थापन झाली आहे आणि सरकार म्हणून सगळ्यांच एकस्पष्ट मत आहे की, कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. फाशीच्या शिवाय दुसरी कोणताही पर्याय असता कामा नये, ही भूमिका मांडली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीमधील मालक आणि त्यांचे चेले अत्याचार प्रकरणाबाबत त्यांचे घाणेरडे राजकारण दाखवत आहेत, असा घणाघात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.
काल बदलापूरमध्ये झालेल्या जनक्षोभानंतर राज्यसरकार अॅक्शन मोडवर गेला आहे. त्याप्रमाणे कारवाई देखील सुरु झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आणि सुप्रिया सुळे यांना सत्तेशिवाय काही येत नाही. महायुती सरकारचे विरोधक इतक्या खालच्या दर्जाचे असतील, याची कोणालाही अपेक्षा नाही. कारण कोलकातामध्ये झालेल्या हत्याकांड तसेच बांग्लादेशमधील हिंदूंबद्दल झालेल्या हिंसाचाराबाबत महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आपले वक्त्व्य मांडले नाही. परंतु काल बदलापूर प्रकरणाबाबत यांनी मांडलेले त्यांचे वकत्तव्य हे फक्त घाणेरडे राजकारण होते. त्यांनी केलेले वकत्व्य हे कोणत्याही माताभगिनी किंवा महाराष्ट्रासाठी नसून केवळ सत्तेसाठी होते. त्यांना ‘सत्ता एके सत्ता’ याशिवाय त्यालोकांना काहीही दिसत नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
संजय राऊतने ‘लाडकी डॉक्टर योजना’ राबवावी
त्याचबरोबर, महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला किती सुरक्षित होत्या याचा पाढा वाचावा लागेल, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने बोलूच नये. उद्धव ठाकरेच्या घरामध्येच एक बलात्कारीचा आरोपी आहे, जो त्याच्यासोबत मातोश्रीमध्ये राहतो. तर संजय राजाराम राऊत याने आता ‘लाडकी डॉक्टर योजना’ राबवली पाहिजे. कारण एका डॉक्टर महिलेचा कसा छळ होतो, हे तिने सातत्याने पोलिसांना सांगितलेले आहे. त्यामुळे यांची माताभगिनींबद्दल बोलण्याची लायकी नाही, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच महायुती सरकार या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना फाशीवर चढवल्याशिवाय गप्प बसणार नाही, ही स्पष्ट भूमिका नितेश राणे यांनी मांडली.
संजय राऊत शेंबड्यासारखे बडबडू नकोस
ज्या शाळेत ही घटना घडली ती भाजपाच्या संबंधित आहे. तसेच जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा न्यायालय दखल घेतात परंतु अशा घटनेनंतर न्यायालयाने का दखल घेतली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यावर नितेश राणे यांनी चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘भाजपाच्या संबधित जरी ही घटना घडली असेल तरीही आम्ही कारवाई करण्याचे थांबलो नाही. तुझ्या नालायक मालकासारखे आम्ही सरकार चालवत नाही. जो कोणी आरोपी होता, ज्या संस्थेमध्ये हे घडले आणि अशी घटना कधीही आपल्या संस्थेत घडू नये असे प्रत्येक संस्थेला वाटते. म्हणून भाजपाच्या संबंधित ही संस्था असली तरीही कारवाई होत आहेच. म्हणून उगाच शेंबड्यासारखे बडबडत राहू नकोस, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.
तसेच न्यायालयालाही मार्गदर्शन करण्याइतका तू दीड शहाणा झाला आहे. तर आता न्यायालयावर अजून एक खुर्ची लावून संजय राजाराम राऊत सारख्या माकडाला बसवा, असे म्हणत नितेश राणे यांनी डिवचले.