मुंबई: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही नवे रिचार्ज प्लान्स लाँच करत असते. यातच कंपनीने बाजारात नवा रिचार्ज प्लान लाँच केला आहे. याची किंमत २०० रूपयांपेक्षाही कमी आहे.
खरंतर, रिलायन्स जिओने आपला १९८ रूपयांचा रिचार्ज प्लान सादर केला आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज २ जीबी इंटरनेट डेटाही मिळतो. यात अनेक फायदे देण्यात आले आहेत. कंपनीच्या या नव्या रिचार्ज प्लानमुळे एअरटेल आणि बीएसएनएलचे टेन्शन नक्कीच वाढू शकते.
जिओचा नवा रिचार्ज प्लान
या नव्या रिचार्ज प्लानमध्ये अनेक फायदे मिळतात. दरम्यान, याची व्हॅलिडिटी जास्त नाही आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान मानला जात आहे. तर याशिवाय कंपनीचा १८९ रूपयांचा रिचार्ज प्लानही आहे. इतकंच नव्हे तर जास्त व्हॅलिडिटीसाठी १९८ रूपयांच्या जागी १९९ रूपयांचा प्लान घेऊ शकता. यात तुम्हाला अधिक व्हॅलिडिटी मिळते.
जिओच्या १९८ रूपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस प्रतिदिनसोबत दररोज २ जीबी डेटा दिला जातो. दरम्यान, याची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. सोबतच नव्या प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
१९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये १८ दिवसांची व्हॅलिडिटी
दुसरीकडे कंपनीचा १९९ रूपयांचा रिचार्ज प्लान १८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लानमध्ये लोकांना १.५ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज ऑफर केले जातात. या प्लानमध्ये युजर्सला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे सबस्क्रिप्शन मिळते.