मुंबई: बदाम केवळ चवीलाच चांगले नाहीत तर ते पोषकतत्वांचे भांडार मानले जाते. हलके भाजलेले बदाम खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, मिनरल, हेल्दी फॅट आणि प्रोटीन मिळतात.
बदाम लोक रात्री पाण्यात भिजत घालतात. सकाळी उठून खातात. यामुळे त्याच्यावर फायटिक अॅसिडचे कवच निघून जाते. यामुळे ते लवकर पचतात. अनेक जण दररोज बदाम खातात तर काहीजण कधी कधी मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज किती बदाम खाल्ले पाहिजेत?
वयस्कर लोकांनी दररोज साधारण ३० ग्रॅम म्हणजेच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. इतक्या प्रमाणात खाल्ल्याने अधिक कॅलरी शरीरात जात नाही जी हेल्दी मानली जाते.
अनेकजण विचारतील इतकेच बदाम का कारण ही संख्या आवश्यक व्हिटामिन, मिनरल्स, हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा बॅलन्स राखतात.
आयुर्वेदात बदाम हे उष्ण प्रवृत्तीचे सांगितले आहे. दरम्यान, भारतात साधारणपणे दिवसाला २ ते ५ भिजलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.
आयुर्वेदानुसार बदाम वात आणि कफ दोष संतुलित करण्याचे काम करतो मात्र त्यामुळे उष्णता वाढत असल्याने पित्त दोष वाढू शकतो.
जर बदामाचे अधिक सेवन केले अथवा खाण्याआधी भिजत घातले नाही तर ते शरीराच्या आत उष्णता वाढवतात. यामुळे अॅसिडिटी अथवा सूज सारखी स्थिती निर्माण होऊ शकते.