पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील देहूरोडवरील काही दुकानांमध्ये मध्यरात्री आग (Dehu Road Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग नेमकं कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. देहूरोडवरील आजूबाजूच्या दुकानांना आग लागू नये यासाठी अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आग लागलेल्या दुकानांमध्ये आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.