Tuesday, July 1, 2025

Airtelचा ३० दिवसांचा स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा

Airtelचा ३० दिवसांचा स्वस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा

मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यांच्या किंमती विविध आहेत. सोबतच वेगवेगळे फायदेही आहेत. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या ३० दिवसांच्या सर्वात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहेत. या प्लानमध्ये युजर्सला अनेक फायदे मिळतील.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा समावेश आहे.


एअरटेलच्या या रिचार्ज प्लानची किंमत २१९ रूपये आहे. अशातच हा परवडणारा प्लान आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण ३ जीबी डेटा मिळेल. हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना कॉलिंगची अधिक गरज असते.


एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला ३०० एसएमएस मिळतात. याचा वापर कम्युनिकेशनसाठी करता येतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला ५ रूपयांचा टॉकटाईम मिळतो. मेसेज संपल्यानंतर या टॉकटाईमने तुम्ही मेसेजही करू शकता.


एअरटेलचा १९९ रूपयांचा रिचार्ज प्लानही आहे हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा मिळतो.

Comments
Add Comment