पोर्श कार अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात आणखी दोघे अटक

Share

पोलिसांच्या अटकेच्या भितीने आरोपींचे दिल्ली, बिहार, गोव्यात पलायन

पुणे : कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणात तब्बल तीन महिन्यानंतर ससून रुग्णालयात मुख्य अल्पवयीन आरोपी यांच्यासोबत कारमध्ये पाठीमागे बसलेल्या अल्पवयीन दोन मुलांच्या वैद्यकीय तपासणीवेळी रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात एका मुलाचे वडील व दुसऱ्या मुलाचे वडीलांचे मित्र यांना मुलांच्या बदल्यात रुग्णालयात रक्ताचे नमुने दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

आदित्य अविनाश सुद (वय- ५२, रा.सोपानबाग, घोरपडी, पुणे) व अशिष सतिश मित्तल (३७, रा.विमाननगर, पुणे) असे आरोपींचे नाव असून त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांचे न्यायालयात हजर केले असता, २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, सदर आरोपी हे पोलिसांचे अटकेची भितीने मागील दहा ते बारा दिवसांपासून दिल्ली, बिहार, गोवा आदी ठिकाणी फिरल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणात एका मुलाचे वडील अद्याप पसार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.

आदित्य सूद हे संरक्षण विभागासाठीचे एव्हिएशन पार्टस बनविणाचे काम करत असून त्यांचा मुलगा विधीसंघर्षित बालकांसोबत पोर्श कारमध्ये घटनेच्या दिवशी होता. त्याने पार्टीत मद्यप्राशन केले असताना देखील तसेच तो मद्याचे अंमलाखाली दिसत असतानाही वैद्यकीय तपासणी दरम्यान अहवालात त्याने मद्यप्राशन केले नसल्याचा नकारात्मक अभिप्राय देण्याकरिता आरोपीने डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अपप्रेरणा दिली.

तसेच वैद्यकीय तपासणीवेळी मुलांएवजी वडिलांनी रक्ताचे नमुने दिले. तसेच संबंधित रक्ताचा नमुना हा अल्पवयीन मुलाचा असल्याचे वैद्यकीय अभिलेखावर तपासणी फॉर्मवर नमूद करण्यात आले. तर, आरोपी अशीष मित्तल हा रिअल इस्टेटचे काम करत असून घटनेच्या दिवशी कारमध्ये असलेल्या एका मुलाच्या वडिलांचा मित्र आहे. संबंधित मुलाने देखील मद्यप्राशन केले असताना त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे दाखवण्यासाठी स्वत:चे रक्ताचा नमुना मुलाचे वडीलांचे सांगण्यावरुन दिला. आरोपींनी संगनमताने रक्त नमुन्याचे व शासकीय कागदपत्रांचे बनावटीकरण केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

24 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

55 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

2 hours ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago