Friday, October 24, 2025
Happy Diwali

Stree 2: बॉक्स ऑफिसवर सुस्साट 'स्त्री २', कमाईचा बनवला नवा रेकॉर्ड

Stree 2: बॉक्स ऑफिसवर सुस्साट 'स्त्री २', कमाईचा बनवला नवा रेकॉर्ड

मुंबई: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या हॉरर-कॉमेडी सिनेमा 'स्त्री २'ची क्रेझ प्रेक्षकांवर जोरदार आहे. ५ दिवसांपासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसवर असे काही वादळ आणले की अक्षय कुमार आणि तापसी पन्नू यांचा सिनेमा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा सिनेमा 'वेदा' बॉक्स ऑफिसवर टिकूच शकला नाही. ५ दिवसांच्या धमकेदार कमाईने 'स्त्री २'ने किती कोटी छापले आहेत घ्या जाणून..

'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसवर केवळ ५ दिवसांतच २०० कोटींचा बिझनेस केला आहे. सोमवारी या सिनेमाने पहिला मंडे टेस्ट होता आणि 'स्त्री २'ने मंडे टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली. रिपोर्टनुसार सोमवारी  'स्त्री २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३७ कोटी रूपयांची कमाई केली.

२०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री

५१.८ कोटी रूपयांच्या कलेक्शनसह धमाकेदार सुरूवातीनंतर 'स्त्री २'ने वीकेंडमध्येही जोरदार कमाई केली आहे. सोमवारच्या कलेक्शननंतर २०० कोटींचा बेंचमार्क या सिनेमाने क्रॉस केला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसवर २२८.४५ कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे.

वेगवान १०० कोटी

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टार 'स्त्री २'ने या वर्षी वेगवान १०० कोटी कमावले. यात कल्कि एडीने वेगवान १०० कोटी जमवले होते.

अक्षय कुमारचा 'खेल खेल में' ठरला फेल

अक्षय कुमार, तापसी पन्नू, फरदीन खान, वाणी कपूर यांचा सिनेमा खेल खेल मेंने ५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर केवळ १५.९५ कोटींचा बिझनेस केला तर या सिनेमाची सुरूवात ५ कोटीच्या कलेक्शनने झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >