Wednesday, July 2, 2025

Earthquake: जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के

Earthquake: जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के

श्रीनगर: धरतीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले.जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. भूकंप इतका जोरदार होतो की लोकांची झोप यामुळे उडाली आणि ते घाबरून उठले. ते सर्व घराच्या बाहेर निघताना दिसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली.


जम्मू-काश्मीरमध्ये काही वेळाच्या अंतराने दोन वेळा भूकंप आला. पहिला भूकंप हा दुसऱ्या भूकंपाच्या तुलनेत अधिक जोरदार होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.९ इतकी होती. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला, पूंछ आणि श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले.


तर दुसरीकडे पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणल्. दरम्यान, आतापर्यंत भूकंपाच्या घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Comments
Add Comment