अजमेर येथील ‘ब्लॅकमेल-ऍण्ड रेप’ प्रकरण
अजमेर : राजस्थानच्या अजमेरमधील सुमारे ३२ वर्षांपूर्वी घडलेल्या ब्लॅकमेल आणि बलात्कार प्रकरणातील (Ajmer 1992 Sex Scandal) उर्वरित ६ आरोपींना जन्मठेप आणि ५ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या प्रकरणातील नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी आणि सय्यद जमीन हुसेन हे सहा आरोपी आज कोर्टामध्ये हजर होते. १९९२ पासूनच्या या प्रकरणामध्ये १०० हून अधिक मुलींना अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेल करण्यात आले होते. तसेच या मुलींवर गॅंग़रेप देखील करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण १८ आरोपी होते. त्यापैकी काही आरोपींना १९९८ मध्ये शिक्षा झाली होती. तर उर्वरित ६ आरोपींना आज, मंगळवारी शिक्षा ठोठावण्यात आली.
कोर्टाने नफीस चिश्ती, नसीम उर्फ टार्झन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहेल गनी आणि सय्यद जमीर हुसैन यांना दोषी ठरवले आहे आणि त्यांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Rajasthan: In Ajmer’s largest blackmail case, six accused, including Nafees Chishti and Naseem alias Tarzan, were found guilty by the Special POCSO Act Court. They blackmailed over 100 girls with obscene photos from 1992 pic.twitter.com/pqwkoPo1fk
— IANS (@ians_india) August 20, 2024
राजस्थानच्या अजमेर येथील गँगने १९९२ साली शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या २५० मुलींची नग्न छायाचित्रे मिळवली होती. त्यानंतर सुमारे १०० हून अधिक विद्यार्थींनींना ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार करण्यात आले. ही टोळी विद्यार्थिनींना फार्म हाऊसवर बोलावून अत्याचार करायची. यामध्ये ११ ते २० वयोगटातील विद्यार्थिनी होत्या.
पोलिसांनी या प्रकरणी कैलाश सोनी, हरीश तोलानी, फारुख चिश्ती, इशरत अली, मोइजुल्ला उर्फ पुतन अलाहाबादी, परवेझ अन्सारी, नसीम उर्फ टारझन, पुरुषोत्तम उर्फ बबली, महेश लुधानी, अन्वर चिश्ती, शमसू उर्फ मॅराडोना आणि चिश्ती यांना अटक केली. ३० नोव्हेंबर १९९२ रोजी अजमेर न्यायालयात पहिले आरोपपत्र सादर करण्यात आले. पहिले आरोपपत्र ८ आरोपींविरुद्ध आणि त्यानंतर ४ स्वतंत्र आरोपपत्र ४ आरोपींविरुद्ध होते. यानंतरही पोलिसांनी अन्य ६ आरोपींविरुद्ध आणखी ४ आरोपपत्रे सादर केली. इथेच पोलिसांची सर्वात मोठी चूक झाली, त्यामुळे प्रकरण लांबत गेले.