Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीBSNLच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, १०५ दिवसांची व्हॅलिडिटी

BSNLच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, १०५ दिवसांची व्हॅलिडिटी

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या रिचार्ज प्लान्सनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. खाजगी कंपन्यांच्या प्लान्सच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर बीएसएनएल सातत्याने चर्चेत आहे. अशातच बीएलएनएलने आपले अनेक शानदार रिचार्ज प्लान्स सादर केले आहेत. यातच एक रिचार्ज प्लान जो ग्राहकांना दररोजी २ जीबी हाय स्पीड इंटरनेट डेटा देतो.

BSNL चा स्वस्त प्लान

आम्ही BSNL च्या ज्या प्लान्सबद्दल बोलत आहोत त्याची किंमत ६६६ रूपये आहे. तर या प्लानची व्हॅलिडिटी १०५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय युजर्सला या प्लानमध्ये १०० एसएमएस दररोज मिळतात.

हाय स्पीड इंटरनेट डेटा

BSNL च्या या प्लानमध्ये युजर्सला एकूण २१० जीबी हाय स्पीड ४जी डेटा मिळतो. या प्लानमध्ये दिवसाला २ जीबी पर्यंत इंटरनेट डेटाचा वापर करता येतो. दररोजचा २ जीबी संपल्यानंतर युजर्सला ४० केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट मिळते. हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना दीर्घकाळ व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड इंटरनेट डेटाचा लाभ घ्यायचा आहे.

लवकर लाँच होणार ४जी सर्व्हिस

मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०२५ पर्यंत बीएसएनएल संपूर्ण देशभरात आपली ४जी सर्व्हिस रोलआऊट करणार आहे. तर २०२५च्या अखेरपर्यंत ५ जी सर्व्हिसली लाँच केली जाऊ शकते. बीएसएनएल सध्या देशभरात आपले जाळे विस्तारत आहे. त्यामुळे त्यांनी सर्व्हिस सुधारण्यावरही भर दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -