Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Stree 2: रविवारच्या कलेक्शनमध्ये तुटले सर्व रेकॉर्ड, २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील

Stree 2: रविवारच्या कलेक्शनमध्ये तुटले सर्व रेकॉर्ड, २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील

मुंबई: यंदाच्या वर्षाचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'स्त्री २' रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करत आहे. १५ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या या सिनेमाने रिलीजनंतर चारच दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. 'स्त्री २' सिनेमा रिलीज होऊ फक्त ४ दिवसच झाले आहे. तसेच रविवारच्या दिवशी या सिनेमाने जबरदस्त कमाई केली. छप्परफाड कमाई करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले.


'स्त्री २'चा १४ ऑगस्टला प्रीव्ह्यू ठेवण्यात आला होता आणि सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज झाला. प्रिव्ह्यू आणि रिलीज डे सोबत सिनेमाने ७६.५ कोटींचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी सिनेमाने ४१.५ कोटींचे कलेक्शन आणि तिसऱ्या दिवशी ५४ कोटींचे कलेक्शन केले. आता चौथ्या दिवसाचा आकडाही समोर आला आहे. रिपोर्टनुसार 'स्त्री २'चौथ्या दिवशी ५५ कोटींची कमाई केली आहे.



२०० कोटींच्या क्लबमध्ये सामील 'स्त्री २'


श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री २' या सिनेमाने चार दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. सिनेमाने भारतात एकूण २२७ कोटींचा बिझनेस केला आहे. 'स्त्री २'हा बॉलिवूडचा या वर्षीचा दुसरा सिनेमा आहे ज्याने २०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Comments
Add Comment