
सारा अली खानने आपल्या राखी सेलिब्रेशनचे हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेआहेत. यात संपूर्ण पटौदी कुटुंब एकत्र दिसत आहे.
या फोटोत पटौदी कुटुंब पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर सेलिब्रेशनचा आनंद आहे.
View this post on Instagram
या फोटोपैकी एका फोटोत सारा आपला छोटा भाऊ जेहला राखी बांधताना दिसत आहे. या दरम्यान ती आई करीनाच्या मांडीवर बसलेली दिसते. याशिवाय दुसऱ्या फोटोत सारा इब्राहिम अली खानला टिळा लावताना दिसत आहे.
तर दुसऱ्या फोटोत सारा इब्राहिमला राखी बांधताना दिसत आहे. यावेेस जेह त्याच्या बाजूला बसलेला आहे. दरम्यान या सेलिब्रेशनमध्ये तैमूर कुठेच दिसत नाही आहे.याआधी सारा अली खान आणि इब्राहिमने आपले वडील सैफ अली खानच्या घरी तिचा बर्थडे सेलिब्रेट केला होता.