मुंबई: देशभरात सोमवारी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुची प्रार्थना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देतो. तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. आज जाणून घेऊया रक्षाबंधनाला भावाने आपल्या बहिणीला तिच्या राशीनुसार कोणते गिफ्ट द्यावे.
मेष – मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. जर तुमची बहीण मेष राशीची आहे तर तुम्ही तिला तांबे धातूपासून बनलेली कोणतीही भेटवस्तू देऊ शकता. तिला घरात सजावटीसाठी शोपीस गिफ्ट करू शकता. तुम्ही बहिणीला लाल रंगाची कोणतीही वस्तू देऊ शकता.
वृषभ – वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. जर तुमच्या बहिणीची रास वृषभ असेल तर तुम्ही तिला परफ्यू अथवा रेशमी कपडा देऊ शकता.
मिथुन – मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. जर तुमची बहीण मिथुन राशीची आहे तर तुम्ही तिला पेन, अभ्यासाशी संबंधित सामान, खेळण्याचे सामान देऊ शकता. तुम्ही तिला निसर्गचित्राची पेंटिंगही देऊ शकता.
कर्क – कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो. जर तुमच्या बहिणीची रास कर्क असेल तर तुम्ही तिला चांदीची कोणतीही गोष्ट भेट देऊ शकता. तिला कोणतीही सफेद रंगाची गोष्ट देऊ शकता.
सिंह – सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. जर तुमची बहीण सिंह राशीची असेल तर तुम्ही सोन्याचे दागिने, तांब्याचे शोपीस, लाकडाच्या काही वस्तू गिफ्ट करू शकता.
कन्या – कन्या राशीचा स्वामी बुध असतो. अशातच तुमची बहीण जर कन्या राशीची असेल तर या रक्षाबंधनाला तुम्ही कांस्य धातूची मूर्ती, हिरव्या रंगाचा ड्रेस, अंगठी अथवा गणेश मूर्ती गिफ्ट करू शकता.
तूळ – जर तुमची बहीण तूळ राशीची आहे तर तिचा स्वामी शुक्र असू शकतो. यावेळी तुम्ही रक्षाबंधनाला बहिणीला कपडे, दागिने अथवा परफ्यूम देऊ शकता.
वृश्चिक – वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. तुमची बहिण वृश्चिक राशीची असल्यास तिला लाल रंगाची कोणती वस्तू, अथवा तांब्याच्या काही गोष्टी भेट देऊ शकता.
धनू – धनू राशीच्या व्यक्तींवर गुरू ग्रहाचा प्रभाव असतो. जर तुमची बहीण धनू राशीची असल्यास तिला पुस्तक, सोन्याचे दागिने, कपडे गिफ्ट देऊ शकता.
मकर – मकर राशीच्या व्यक्तींवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. जर तुमची बहीण या राशीची असल्यास तिला इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस अथवा गाडी गिफ्ट करू शकता.
कुंभ – कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. जर तुमच्या बहीणीची रास कुंभ असेल तर तुम्ही तिला सुंदर फूटवेअर, ब्रेसलेट, दगडापासून बनलेले शोपीस गिफ्ट करू शकता.
मीन – मीन राशीचा स्वामी गुरू आहे. जर तुमच्या बहिणीची रास मीन असेल तर तुम्ही तिला सोन्याचे दागिने, पिवळी मिठाई आणि पिवळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकता.