Friday, September 19, 2025

२४ ऑगस्टला शुक्रचे कन्या राशीत गोचर, या राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

२४ ऑगस्टला शुक्रचे कन्या राशीत गोचर, या राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

मुंबई: २४ ऑगस्टला उर्जाचे कारक शुक्र ग्रह कन्या राशीत गोचर करत आहे. शुक्र रात्री १२.५९ मिनिटांनी कन्या राशीत येणार आहेत.ज्योतिषात शुक्र गोचर अतिशय खास मानले जाते. शुक्रच्या कृपेने जीवनात धन आणि सुख समृद्धी प्राप्त होते. कन्या राशीत आधीपासूनच केतु विराजमान आहेत. यामुळे शुक्र-केतु महासंयोग निर्माण होईल.

शुक्रच्या गोचरमुळे पुढील एक महिन्यांपर्यंत कोणत्या राशींना जबरदस्त लाभ होणार आहे घ्या जाणून

वृषभ

शुक्रचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी पंचम भावात असेल. या वेळेस मुलांची प्रगती होऊ शकते. भाग्याची साथ लाभेल. पैशांचा लाभ होईल. सोबतच नात्यात आनंद मिळेल.

कर्क

शुक्राचे गोचर कर्क राशीच्या तिसऱ्या भावात होईल. सुख-सुविधा मिळतील. जोडीदारासोबत ताळमेळ चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्य चांगले राहील.

कन्या

शुक्र गोचर कन्या राशीसाठी पहिल्या भावात असेल. नोकरीत बदल झाल्याने लाभ होईल. बिझनेस पार्टनरसोबत स्थिती मजबूत राहील. पैसा प्राप्त होईल.

तूळ

शुक्र गोचर तूळ राशीच्या लोकांच्या बाराव्या भावात होईल. करिअरच्या दृष्टीने ही वेळ चांगली आहे. कामाच्या ठिकाणी सुख-सुविधा प्राप्त होतील. सर्व कामात यश मिळेल.

वृश्चिक

शुक्र गोचर वृश्चिक वाल्यांसाठी ११व्या भावात असेल. परदेशी जाण्याचे योग बनत आहेत. यामुळे यश मिळेल. भाग्याची साथ मिळेल. कामाचा दबाव कमी होईल. व्यवसायिक लाभ होतील.

Comments
Add Comment