नांदगाव मुरुड(उदय खोत)- श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने दर्याला शांत होण्याचे आवाहन करतांनाच यावर्षीचा मच्छीमारीचा हंगाम चांगला जाऊदे म्हणून आर्त विनवणी करीत मोठ्या भक्तिभावाने नारळ व राखी अर्पण केला.
तसेच नारळी पौर्णिमेच्या दिवशीच कोळीवाड्यात सकाळी पुजन केलेल्यामंगळागौरीच्या विसर्जनाच्या निघालेल्या भव्य मिरवणुकीत मोठ्या हर्षोल्लासात नाचणाऱ्या नांदगाव मधील कोळी बंधू भगिनींच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.
सायंकाळी नांदगावच्या ग्रामस्थांनी गावातून काढलेल्या नारळाच्या मिरवणुकीच्या बरोबरीनेच कोळीवाड्यातील बंधू भगिनींच्या निघालेल्या या मिरवणूकीने कोळीवाडा व आजुबाजूचा परिसर गजबजून गेला होता.सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीत कोळी भगिनींनी आपल्या पारंपरिक वेशभूषा साकारल्या होत्या.
त्यांनी डोक्यावर सजवलेला करा तर काहींच्या मंगळागौर होत्या.बेंजोच्या तालावर अनेक तरुण तरुणींनी ठेका धरला होता.तर मिरवणुकीत सजवलेल्या मोठ्या नारळासह पंच कमिटीच्या गुरुजींच्या हाती पूजन केलेला नारळ होता.मिरवणूक शांततेत पार पडली.