Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPraveen Darekar : यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने अपरिपक्व वक्तव्य करणे चुकीचे!

Praveen Darekar : यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने अपरिपक्व वक्तव्य करणे चुकीचे!

रामदास कदम यांना भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सर्वच पक्ष रणनिती आखत असताना महायुतीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु झालाय. शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आणि भाजपाचे विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण (Ramdas Kadam) यांच्यात दापोली मतदारसंघासाठी वाद सुरु असताना महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. यावर प्रत्युत्तर देताना भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी भाजपाला युतीची गरज आहे हा गैरसमज असल्याचे म्हटले आहे.

रामदास कदम यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने अपरिपक्व वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांचे काहीही म्हणणे असेल तर ते त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चार भितींच्या आत सांगून त्यावर मार्ग काढावा. पण रामदास कदम यांचा स्वभाव अशाप्रकारची खळबळजनक वक्तव्ये करायची आणि वाद निर्माण करायचा असा आहे. तुम्ही बोललात तर आम्हालाही बोलता येते. रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत आधी तुम्ही वक्तव्ये केलीत. महायुतीत धर्म पाळायला हवा. तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायची. रायगड रत्नागिरी आमचं सांगता. मग भाजपाच्या कार्यकर्त्यांची पण अस्वस्थता समजून घ्या. ठाण्यात तीन आमदार आमचे आहेत. नरेश म्हस्केंना, रवींद्र वायकरांना खासदार आमच्या लोकांनी केले. तुम्हाला नाशिक, डोंबिवलीची जागा दिली. उणीदुणी काढलीत तर आमचीही तयारी आहे. युतीची गरज सगळ्यांना आहे. उद्या आमच्या बाजूनेही बोलतील. रामदास कदमांनी चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकू नये. भाजपाला युतीची गरज आहे अशा भ्रमात ते असतील तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

रामदास कदम यांची वैयक्तिक कारणातून आलेली खदखद आहे. रामदास कदम यांचा मुलगा ज्या ठिकाणी आमदार आहे त्याठिकाणी भाजपा नसेल तर निवडूण येणे अवघड होणार आहे. रामदास कदमांच्या मुलाला मंत्री व्हायचे होते. मुलगा मंत्री न झाल्याने ते बैचेन आहेत. त्यामुळे ते वैफल्यातून खदखद बाहेर येत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संयम आहे याला तुम्ही आमचा दुबळेपणा समजू नका. भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. सारख्या हुलकावण्या मारणार असाल तर आम्ही सहन करायला बसलेलो नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -