Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीAjit Pawar : अजितदादांची राष्ट्रवादी लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक!

Ajit Pawar : अजितदादांची राष्ट्रवादी लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक!

उमेदवारांची नावंही निश्चित केल्याची माहिती

मुंबई : नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पत्रकार परिषद घेत हरियाणा (Haryana) आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका (Jammu Kashmir Vidhansabha Election) जाहीर केल्या. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील निवडणुका लांबणीवर जाणार असल्याचे कळले. तरीही महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आतापासूनच विधानसभेसाठी कंबर कसून तयारी करत असल्याचे समजले. यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी उमेदवारांची नावंही निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील जवळपास २५ जागांवर अजित पवार गटाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. यातील १० ते १५ उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. पुढील म्हणजेच सप्टेंबर महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये ३ टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. गेल्या १० वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली नाही. कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ८३ जागा होत्या. पण यंदा ७ जागा वाढल्या असून ९० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. नुकतेच अजित पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी त्या ठिकाणी दौरा केला. ८ दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यासोबतच त्यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांची नावे सुचवली. यातील १० ते १५ जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. अजूनही काही उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जात असून लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -