मुंबई: विराट कोहलीने १६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कोहलीने श्रीलंकेविरुद्ध आपल्या करिअरमधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने वनडेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. करिअरच्या सुरूवातीपासूनच त्याने आपला दबदबा बनवण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर त्याला किंग कोहली हे बिरूद मिळवले.
आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर विराट कोहलीने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के केले. त्यानंतर हळूहळू त्याला कर्णधारपदाच्या रूपात पाहिले गेले. एमएस धोनीनंतर विराटला तीनही फॉरमॅटमधील कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. कोहलीच्या नेतृत्वात कोहलीने मोठे यश मिळवले.
वनडेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या किंग कोहलीने हळूहळू तीनही फॉरमॅटमध्ये स्थान मिळवले. २०१०मध्ये त्याने टी-२०मध्ये पदार्पण केले त्यानंतर २०११मध्ये किंग कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले.
From debut to certified GOAT status.🐐
Through 16 years of relentless passion, Virat didn’t just play the game, he set the blueprint for a new perfect brand of cricket! 🫡#PlayBold #OnThisDay #ViratKohli #16YearsOfViratKohli pic.twitter.com/Ng3SGwzmwr
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 18, 2024
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप खिताब जिंकताच विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२०मधून निवृत्ती जाहीर केली होती.
आतापर्यंत असे राहिले करिअर
विराट कोहलीने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये ११३ कसोटी, २९५वनडे आणि १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीतील १९१ डावांमध्ये त्याने ४९.१५च्या सरासरीने ८८४८धावा केल्या आहेत. कसोटीत किंग कोहलीच्या बॅटमदून २९ शतके आणि ३० अर्धशतके निघाली आहेत.
वनडेमधील २८३ डावांमध्ये त्याने ५८.१८च्या सरासरीने १३९०६ धावा केल्या आहेत. यात ५० शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. बाकी टी-२० आंतरराष्ट्रीयमधील ११७ डावांमध्ये किंग कोहलीने ४८.६९च्या सरासरीने तसेच १३७.०४च्या स्ट्राईक रेटने ४१८८ धावा केल्यात. यात १ शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.