गोंदिया : समाज, परिवार आणि सगेसोयरे सर्व त्यागून जगदगुरु संत तुकोबा रायांच्या अभंगातील ओळी या सामाजिक, नैसर्गिक बांधीलकी जोपासणे ही मानवाची जबाबदारी आहे असे सांगतात. आणि हे खरेच सत्यामध्ये उतरविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात नंगपूरा-मुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आक्सिजन देऊन माणसांना जगविनारे वृक्षांना राखी बांधून सामाजिक सलोखा राखला आहे. निसर्ग आपला सखा आहे. याची जाणीव या उपक्रमातून घडवून दिली. म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या या ओळी सार्थकी ठरतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षांना बांधू रक्षाबंधने…! असे म्हणावेच लागते.
लोकपरंपरा आणि आपला सांस्कृतिक वारसा जपणे हे प्रत्येक मानवी संस्कृती जपणारे नागरिकांचे कर्तव्य आहे. असाच हा एक उत्सव रक्षाबंधन (राखी) आहे. मोठ्या आनंदाने बहीण ही भावाला ओवाळणी घालून रक्षाबंधन बांधून रक्षा करावी अशी मनोकामना करते. हा दृष्टांत ठेवून शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री येथील वर्ग सहावी ते दहावीच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी झाडांची म्हणजे वृक्षांची रक्षा करण्यासाठी रक्षाबंधने बांधली. वृक्षांची संवर्धन करावी, झाडे लावावी-झाडे जगवावी, वृक्षांची कत्तली होणार नाही. असेही याप्रसंगी सांगण्यात आले.