Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीStree 2: 'स्त्री २'चे रेकॉर्ड तोड कलेक्शन, २ दिवसांत कमावले तब्बल इतके...

Stree 2: ‘स्त्री २’चे रेकॉर्ड तोड कलेक्शन, २ दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी

मुंबई: ‘स्त्री २’ सिनेमाची क्रेझ सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड पाहायला मिळत आहे. जेवढी उत्सुकता या सिनेमाच्या रिलीजआधी पाहिली जात होती त्यापेक्षा अधिक हा सिनेमा रिलीज झाल्यावर पाहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘स्त्री २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ची टक्कर अक्षय कुमारचा सिनेमा खेल खेल में आणि जॉन अब्राहमना वेदा शी होती. मात्र श्रद्धा-राजकुमार यांच्या सिनेमाने दोन्ही सिनेमांना मागे टाकले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

पहिल्या दिवशी ‘स्त्री २’ने रचला इतिहास

‘स्त्री २’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात ७६.५० कोटींची एकूण कमाई केली. कमाईबाबतचे त्यांची सर्व अनुमान पहिल्याच दिवशी मोडीत काढले. आता दुसऱ्या दिवसाचीही एकूण कमाई समोर आली आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी सुट्टी होती. मात्र दुसरा दिवस वर्किंग असल्याने त्यात थोडी घट झाली मात्र इतर सिनेमांच्या तुलनेने या सिनेमाने शानदार कमाई केली.

रिपोर्टनुसार ‘स्त्री २’ने दुसऱ्या दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच दुसऱ्या दिवशी भारतात सिनेमाची एकूण कमाई ४५ कोटींपेक्षा अधिक असेल. यासोबतच स्त्री २ने केवळ दोन दिवसांतच १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -