Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Kolkata case: कोलकाता प्रकरणी सूर्यकुमार यादवने व्यक्त केला संताप

Kolkata case: कोलकाता प्रकरणी सूर्यकुमार यादवने व्यक्त केला संताप

मुंबई: कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरसोबत झालेल्या बलात्कार आणि मृत्यूप्रकरणी देशांतील विविध भागांमध्ये विरोध प्रदर्शने केली जात आहेत. यातच अने क्रिकेटर्सनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. टीम इंडियाचा टी-२० कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सूर्यकुमार यादवनेही कोलकाता बलात्कार आणि हत्येप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याने सोशल मीडियावर मुलांना शिक्षित करण्याचा सल्ला दिला आहे. सूर्याने इन्स्ट्ग्रामवर मेसेज शेअर केला आहे.


सूर्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कोलकाता प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याने लिहिले, आधी आपल्या मुलींना सुरक्षित करा मात्र या वाक्यावर त्याने काट मारली आहे. यानंतर लिहिले आपल्या मुलांना सुशिक्षित करा. आपले भाऊ, वडील, आपले पती आणि आपल्या मित्रांना सुशिक्षित करा. सूर्याच्या आधी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्याने कोलकाता केसवर आपला राग व्यक्त केला होता.


सूर्यकुमार यादव लवकरच दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली आहे. सूर्या आणि ऋतुराजसोबत सी संघात साई सुदर्शन, रजत पाटीदार आणि उमरान मलिकही आहेत. दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना ५ सप्टेंबरला टीम ए आणि टीम बी यांच्यात खेळवला जाईल. टीम सीचा पहिला सामना टीम डीशी असणार आहे.

Comments
Add Comment