मुंबई: रिलायन्स जिओने नुकतेच आपले रिचार्ज प्लान महाग केले होते. यानंतर लोकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या खर्चात मात्र वाढ झाली आहे.
काय आहे किंमत
आज जिओचा असा रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत ज्याची किंमत केवळ १९८ रूपये आहे. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळेल.
अनलिमिटेड कॉल
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये एकूण २८ जीबी डेटा मिळेल. हा हाय स्पीड इंटरनेट डेटा असेल.
१९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतात. १४ दिवसापर्यंत ही सुविधा तुम्हाला मिळते.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळतो.
जिओने रिचार्जच्या डिस्क्रीप्शनमध्ये सांगितले आहे की जिओ सिनेमा प्रीमियमचा यात समावेश नाही.
जिओचे अनेक रिचार्ज प्लान्स त्यांच्याकडे आहेत. यात २ जीबी डेटा आणि २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला ३४९ रूपयांचा रिचार्ज आहे.