Friday, October 17, 2025
Happy Diwali

रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही करू नका या ५ चुका

रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही करू नका या ५ चुका

मुंबई: दरवर्षी श्रावणातील पोर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाकडून रक्षणाचे वचन घेते.

या वर्षी रक्षाबंधनाचा सण १९ ऑगस्टला साजरा केला जात आहे. शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी काही चुका चुकूनही करू नका.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहि‍णींनी प्लास्टिक अथवा अशुभ चित्रांच्या राखी बांधू नयेत. तुटलेल्या राखीही बांधू नयेत.

रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळात भावाला राखी बांधू नये. शास्त्रात भद्रा काळात राखी बांधणे वर्ज्य मानले गेले आहे. असे म्हणतात की शूर्पणखाने याच अशुभ काळात रावणाला राखी बांधली होती आणि त्याच्या संपूर्ण साम्राज्याचा विनाश झाला होता.

रक्षाबंधनाच्या दिवशी घरात मटण,मच्छी तसेच दारूचे सेवन करू नये. या दिवशी लसूण-कांद्याचे सेवनही टाळावे.

रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्याही महिला अथवा वयस्कर व्यक्तीचा अपमान करू नये. यादिवशी सगळ्यांशी प्रेमाने वागावे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण-भावाने काळ्या रंगाची वस्त्रे घालू नयेत. या दिवशी लाल अथवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.

Comments
Add Comment