नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांनी चेन्नईत अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार राकेश पाल यांना बेचैनी जाणवत असल्याने राजीव गांधी जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. सोबतच त्यांना एंजिओ टेस्ट करण्यासाठी सांगितले. मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी रुग्णालयात जात राकेश पाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. राकेश पाल यांचे पार्थिव दिल्लीला आणले जाईल.
इंडियन कोस्ट गार्डचे डीजी यांच्या निधनाप्रती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. चेन्नईत आज भारतीय तटरक्षख दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे आकस्मिक निधन ही दु:खाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वात ICG भारताचे समुद्री सुरक्षा मजबूत करण्यात मोठी प्रगती करत होते. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत.
कोण होते राकेश पाल?
राकेश पाल उत्तर प्रदेशचे राहणारे होते. त्यांना गेल्या वर्षी भारतीय तटरक्षक दलाचे २५वे महासंचालक म्हणू नियुक्त करण्यात आले होते. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी होते. राकेश पाल जानेवारी १९८९मध्ये भारतीय तटरक्षक दलाचे सामील झाले होते.