Monday, September 15, 2025

बुद्ध विहाराचे बांधकाम अर्धवट ठेवून ठेकेदार फरार, मागील वर्षभरापासून काम अपूर्णच

बुद्ध विहाराचे बांधकाम अर्धवट ठेवून ठेकेदार फरार, मागील वर्षभरापासून काम अपूर्णच

मोनिश गायकवाड

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील गंधकुटी बुद्ध विहाराचे काम भिवंडी पश्चिमचे भाजपाचे आमदार महेश चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून भूमिपूजन करून जवळपास दीड वर्ष झाला. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम आजपर्यंत झाले नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

दहा लाख रुपयांचा निधी या बुद्ध विहाराच्या बांधकामाकरिता मंजूर केला असून ठेकेदाराने मागील वर्षभरात फक्त पायाचे बांधकाम केले असून उर्वरित बांधकाम मागील वर्षभरापासून तसेच अर्धवट ठेवले असून दहा लाख रुपयांचा निधी ठेकेदाराने अर्धवट काम ठेवून फरार झाला आहे.

अनेकदा मागणी करून देखील ठेकेदार काम करीत नसल्याने स्थानिक भीम अनुयायांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भिवंडी पश्चिम चे आमदार महेश चौगुले यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दुसरा ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करावे अशी मागणी मोनीश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Comments
Add Comment