Thursday, June 19, 2025

Railway Megablock : उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक!

Railway Megablock : उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक!

वेळापत्रक पाहून प्रवाशांनी घराबाहेर पडावे...


मुंबई : मुंबईकरांचा (Mumbai Local) रविवारचा लोकल प्रवास तापदायक होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway) विविध कामांसाठी मेगाब्लॉक (Megablock) आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत लोकलच थांबणार नाहीयेत. त्यामुळं नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असं आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


मुख्य मार्गावर हा ब्लॉक ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत घेण्यात येईल .


यावेळी डाऊन जलद व अर्ध-जलद मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९.४६ वाजता सुटणारी बदलापूर लोकल ते दुपारी २.४२ वाजता सुटणारी आसनगाव लोकलपर्यंत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तसेच नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचेल.


कल्याण येथून १०.२८ वाजता सुटणारी अंबरनाथ लोकल ते कल्याण येथून दुपारी ३.१७ वाजता सुटणारी बदलापूर लोकल पर्यंतच्या अप जलद, सेमी जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील आणि पुढे ठाणे स्थानकावरील अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचेल.


डाउन हार्बर मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे, गोरेगाव येथे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर येत्या रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल.


या ब्लॉक कालावधीत, सर्व जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील तसेच अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा