Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीKonkan Railway : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! आता बोरिवलीहून थेट कोकण गाठता येणार

Konkan Railway : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! आता बोरिवलीहून थेट कोकण गाठता येणार

गणेशोत्सवासाठी रेल्वे मंत्र्यांचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) काही दिवसांवर येवून ठेपला आहे. अशातच अनेक चाकरमानी लाडक्या बाप्पाचे आगमन करण्यासाठी कोकणात जातात. कोकणात (Konkan) जाण्यासाठी प्रवाशांची आरक्षण तिकीट बुकिंग करण्यासाठी एकच झुंबड उडते. चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून (Central Railway) दरवर्षी गणेशोत्सवामध्ये विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून आणखी एक आनंदाची बातमी मिळत आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी बोरिवलीहून थेट कोकणात जाण्याकरता नवी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई येथील उपनगरात राहणार्‍या चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर मुंबईतील माणूस आपल्या गावाकडे म्हणजेच कोकणात जात असताना दादर, सीएसएमटी असे फिरुन जावे लागत होते. त्यामुळे कित्येक वर्षांपासून बोरिवलीमधून कोकणाला जाण्यासाठी रेल्वे असावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. नागरिकांची अडचण लक्षात घेता केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बोरीवलीवरून थेट कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीकडे जाण्याकरता पुढील आठवड्यापासून नव्याने रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे.

दरम्यान, बोरिवलीच नव्हे तर गोरेगाव अगदी वसईमधून जाणाऱ्यांना ही नवीन गाडी उपयुक्त ठरणार आहे. ही रेल्वे २३ ऑगस्टपासून सुरु होणार असून याबबात पहिला कार्यक्रम बोरिवलीमधून कोकणाकडे जाणाऱ्या गाडीचा २४ ऑगस्टला सकाळच्या वेळेत होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. कोकण रेल्वे मार्गावरील दुसरा टॅॄक केल्याने इतर
    गाड्या ना विलंब होनार नाही.

  2. राणे साहेब,गोयल साहेबांनी आणि अश्विनी साहेब ह्यांच्या प्रयत्नांनी सिंधुदुर्ग साठी कोकण रेल्वे सुरू होत असल्याचा मला फार आनंद होतो आहे .

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -