Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीVidhansabha Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला उशीर का? निवडणूक आयुक्तांनी सांगितलं कारण

Vidhansabha Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला उशीर का? निवडणूक आयुक्तांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाची (Central Election Commission) आज दुपारी पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा (Vidhansabha Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला मात्र, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. याबाबत तेथे उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी यामागील कारण स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचा विचार करून आणि महाराष्ट्रातील सण-उत्सव लक्षात घेत निवडणूक उशिरा घेण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण कुमार यांनी दिलं आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका साधारणतः एकत्र घेण्यात येतात. मात्र, यावर्षी महाराष्ट्राचा विधानसभा कार्यक्रम जाहीर न केल्यामुळे पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “पूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या. ३ नोव्हेंबर ही हरियाणाची तारीख असून महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत आहे. मात्र मागच्या वेळी जम्मू-काश्मीरमधील निवडणुका हा मुद्दा नव्हता. यंदा ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांनंतर दिल्ली विधानसभेसाठी मतदान होईल.

यंदा जम्मू-काश्मीरच्याही निवडणुका होत असल्याने आणि तिथे लागणाऱ्या यंत्रणेचा विचार करता आम्ही दोन-दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला. तसंच जम्मू-काश्मीरची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच मध्येच दुसऱ्या राज्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं योग्य नाही. महाराष्ट्राच्या निवडणुका उशिरा घेण्यामागे इतरही कारणे आहेत. काही दिवसांनी गणोशोत्सव, पितृपक्ष, दिवाळी असे सणही येत आहेत. त्यामुळे आम्ही निवडणूक कार्यक्रमाचे त्या अनुषंगाने नियोजन करत आहोत,” अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -