Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Vanchit Bahujan Aghadi : विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह!

Vanchit Bahujan Aghadi : विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह!

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीबाबत (Vanchit Bahujan Aaghadi) एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी 'गॅस सिलेंडर' हे चिन्ह दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला पाचपैकी चार मतदारसंघांत तीन वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली होती. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला रामटेक आणि गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलिंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात उसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर हे निवडणूक चिन्ह दिले होते.


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने वंचितला एकच निवडणूक चिन्ह देण्याचे टाळले होते. आता विधानसभेला निवडणूक आयोगाने गॅस सिलिंडर चिन्ह दिलं आहे.


Comments
Add Comment