Friday, July 11, 2025

Rakshabandhan 2024 : यंदाचा रक्षाबंधन असणार खास! एकाच दिवशी जुळून आले ४ शुभयोग

Rakshabandhan 2024 : यंदाचा रक्षाबंधन असणार खास! एकाच दिवशी जुळून आले ४ शुभयोग

जाणून घ्या योग्य मुहूर्त आणि तिथी


मुंबई : हिंदू धर्मात भाऊ बहिणीचा खास सण म्हणजेच 'रक्षाबंधन' (Rakshabandhan 2024) सणाला फार महत्त्व असते. यंदा हा सण १९ ऑगस्ट रोजी येणार आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते. तर आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन भाऊ या दिवशी बहिणीला देतो. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.


दरवर्षीप्रमाणे यंदाचा रक्षाबंधन विशेष मानला जाणार आहे. कारण यावेळी एकाच दिवशी चार शुभयोग जुळून आले आहेत. जाणून घ्या कोणते आहेत ते शुभ योग. तसेच रक्षाबंधन साजरा करण्याचा योग्य मुहूर्त आणि तिथी.



पौर्णिमा तिथी केव्हा आणि वेळ काय?


पौर्णिमा तिथी १९ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल.



कोणते आहेत चार शुभ योग?



  • सर्वार्थ सिद्धी योग : सर्वार्थ सिद्धी योग शुभ कार्यासाठी अतिशय लाभदायी मुहूर्त मानला जातो. हा शुभयोग १९ ऑगस्टला सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत असेल.

  • रवियोग : रवियोग हा शुभकार्यासाठी लाभदायक योग मानला जातो.

  • शोभन योग : शोभन योग शुभता आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे.

  • श्रवण नक्षत्र: हे नक्षत्र शुभ कार्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.


योग्य मुहूर्त


हिंदू पंचांगानुसार, यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार असून, हा मुहूर्त रात्री ९ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. एकूणच हा शुभ मुहूर्त ०७ तास आणि ३७ मिनिटांचा असेल.


(टीप : सदर दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रांच्या आधारे दिली आहे. 'प्रहार' या कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा