विद्यार्थ्यांना पीएमपी बसपासमध्ये ७५ टक्के सवलत मिळणार

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीबाहेर शिकणाऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीच्या हद्दीत कोणत्याही शाळेत जाण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा पास देण्यात यावा, अशी मागणी भाजप (BJP) शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना बसपासमध्ये ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांनी बसपाससाठी केवळ २५ टक्के रक्कम भरावयाची आहे. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा प्रवासी पास दिला जातो. त्याचा या शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी वापर करता येत आहे. मात्र या सवलतीच्या पासचा लाभ केवळ पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीपुरताच विद्यार्थ्यांना घेता येत होता. हा नियम पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा होता. दुसरीकडे पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी मात्र वेगळा नियम केला गेला आहे. पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलमार्फत देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासचा वापर पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए या तीनही नियोजन संस्थांच्या हद्दीत करण्याचा नियम आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना केवळ आपल्याच महापालिका हद्दीत सवलतीच्या पासचा लाभ घेण्याची सक्ती करण्यात आली होती.


ही बाब लक्षात आल्यानंतर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांवर पीएमपीएमएलच्या सवलतीच्या बसपास संदर्भात होणारा अन्याय दूर करण्यास सांगितले. या शहरातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासचा लाभ पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए या तीनही नियोजन संस्थांच्या हद्दीत घेता यावा यासाठी नियमात बदल करण्यात यावा. या बदललेल्या नियमाची चालू शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी सुरू करून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीच्या हद्दीत कोणत्याही शाळेत जाण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा पास देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

विद्यार्थ्यांना भरावं लागणार केवळ २५ टक्के रक्कम


६ ऑगस्ट रोजी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील कोणत्याही शाळेत जाण्यासाठी बसपासमध्ये ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चालू शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना आता केवळ २५ टक्के रक्कम भरून पीएमपीएमएलचा सवलतीचा पास उपलब्ध होईल.

Comments
Add Comment

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या

Ekvira Devi Karla : आई एकवीरा देवीच्या खजिन्यावर अध्यक्षांचा डल्ला? दागिने आणि रोकड हडपल्याचा पुजाऱ्याचा खळबळजनक आरोप!

लोणावळा : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थान (Ekvira Devi Karla) ट्रस्टमध्ये गेल्या

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार