मुंबई : श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rav) यांच्या १५ ऑगस्ट रोजी प्रदशित झालेल्या ‘स्त्री २’ (Stree 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४६ कोटींहून अधिक कमाई करून नवा रेकॉर्ड केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने फास्ट ट्रॅक पकडून अर्धशतक पूर्ण केले आहे. इतकेच नव्हे तर गदर २, टायगर ३ आणि जवान अशा सुपरहिट चित्रपटांनाही श्रद्धा कपूरच्या या सिनेमाने मागे टाकले आहे. तसेच ‘स्त्री २’ ने हिंदी भाषेत पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सर्वोच्च १० चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्री चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. ‘स्त्री’च्या यशानंतर स्री २ सुद्धा प्रेक्षकांना पाहायला आवडतोय. बॉक्स ऑफिस वर येताच ‘स्त्री २ ‘ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा केली. तर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यावर अगदी २ दिवसात ‘स्त्री २’ हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. त्यासोबतच बॉलिवूडमध्ये नवा इतिहास देखील रचला आहे.
दरम्यान, स्त्री २ आठवड्याभरात १०० कोटींचा टप्पा पार करु अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रद्धा कपूरला शुल्क म्हणून ५ कोटी रुपये आणि राजकुमार रावला ६ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. हा चित्रपट आणखी किती कमाई करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.