मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. पंतप्रधान मोदींना टेक्नॉलॉजीची आवड आहे. यामुळे ते अनेकदा सेल्फी घेताना दिसतात. अशातच लोकांच्या मनात असाही सवाल येत असेल की अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्टफोन वापरत असतील. पंतप्रधान मोदींकडे जो फोन आहे तो खूपच अॅडव्हान्स आहे. सोबतच हा फोन ट्रेस आणि ट्रॅक करता येऊ शकत नाही. जाणून घेऊया याबद्दल..
कोणता फोन वापरतात पंतप्रधान मोदी
काही मिडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जो फोन वापरतात तो सरकारी स्तरावरूल हाय सिक्युरिटी फोन आहे. या फोनचे नाव रुद्रा आहे. हा हाय सिक्युरिटीवाला फओन भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रसारण मंत्रालयाकडून बनवण्यात आला आहे. सोबतच एक अँड्रॉईड फोन आहे. यात एक खास सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टीम मिळते. हा फोन अधिक सुरक्षित आणि अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्सनी परिपूर्ण आहे.
कोणता आहे खाजगी फोन?
काही मिडिया रिपोर्ट्सनुसार कधी कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला खाजगी फोन वापरू शकता. दरम्यान, या फोनबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र पंतप्रधान मोदींजवळ गेल्या वर्षी नवा सरकारी फोन आला आहे याचे नाव रुद्राआहे. या फोनमध्ये एक इन बिल्ट सिक्युरिटी चिप प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने सायबर हल्ल्यापासून संरक्षण मिळते. सोबतच यात विशेष ऑपरेटिंग सिस्टीम मिळते.