Friday, June 13, 2025

MP Crime : मध्यप्रदेश हादरलं! तीन तुकडे केलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची पटली ओळख

MP Crime : मध्यप्रदेश हादरलं! तीन तुकडे केलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची पटली ओळख

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु


गुना : देशातील बलात्काराच्या (Rape) आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक बाब आहे. कोलकात्यात (Kolkata news) आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे तर संपूर्ण देश हादरला आहे. त्यातच मध्यप्रदेशातून (MP Crime) देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. मध्य प्रदेशातील गुना येथे तीन दिवसांपूर्वी एका महिलेच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन ते पोत्यात भरुन फेकल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलं होतं. या महिलेची आता ओळख पटली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील चाचोडा बिनागंज भागातील खातोली गावात एका रेशन दुकानाच्या आवारात ३ दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह तीन तुकड्यांमध्ये सापडला होता, ज्यामुळे सारेच हादरले होते. ही महिला सांडिल्यखेडी गावातील रहिवासी असल्याची माहिती आता मिळाली आहे. झुनाबाई तन्वर (वय वर्ष ४०) असं या महिलेचं नाव असून पतीच नाव शेरू सिंह असल्याचे सांगण्यात येत आहे.


झुनाबाई यांचा मुलगा गोविंद सिंग याने सांगितले की, त्याची आई बिनागंज येथे राखी खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथील एका संशयितालाही ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.



हातावरील टॅटूने पटली ओळख


गुनाचे एसपी संजीव कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, खतौली गावात एका गोणीत महिलेचा मृतदेह सापडला होता. तो सांडिल्यखेडी येथील रहिवासी महिलेचा असल्याचं समोर आले आहे. तिच्या हातावराल ए आकाराचा टॅटू पाहून पती शेरू सिंग आणि मुलगा गोविंद सिंग यांनी मृतदेहाची ओळख पटवली.



शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा


महिलेचे डोके, धड आणि कमरेच्या खालचा भाग कापून सरकारी रेशन दुकानाच्या आवारात गोण्यांमध्ये ठेवण्यात आला होता. त्यावर माश्या भिरभिरत होत्या. जेव्हा लोकांना दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. महिलेच्या शरीराचे कटरने तुकडे करण्यात आले होते. सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती एसडीओपी दिव्या राजावत यांनी दिली.

Comments
Add Comment