Saturday, March 22, 2025
Homeक्रीडाIshan Kishan: इशान किशनचे जोरदार कमबॅक, झारखंडसाठी ठोकले शतक

Ishan Kishan: इशान किशनचे जोरदार कमबॅक, झारखंडसाठी ठोकले शतक

मुंबई: इशान किशनने विस्फोटक कमबॅक केले आहे. तो बुची बाबू क्रिकेट स्पर्धेमध्ये झारखंडसाठी खेळत आहे. इशानने मध्य प्रदेशविरुद्ध कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने १०७ चेंडूचा सामना करताना ११४ धावा ठोकल्या. इशानने या खेळीदरम्यान १० षटकार ठोकले. तो बॅटिंग करताना अनेक शॉट खेळत होता.

इशान झारखंडचा कर्णधार आहे. झारखंड आणि मध्य प्रदेश यांच्यात शंकर नगरच्या इंडिया सिमेंट ग्राऊंडमध्ये सामना सुरू आहे. मध्य प्रदेशने पहिल्यांदा खेळी करताना २२५ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात झारखंडचा संघ फलंदाजी करत आहे. यासाठी इशान सहा नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने १०७ चेंडूचा सामना करताना ११४ धावा केल्या. इशानने या खेळीत ५ चौकार आणि १० षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट १०६.५४ इतका होता.

इशान किशनला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवरून हटवले होते. तो डोमेस्टिक क्रिकेट खेळत होता. यावरून मंडळाची नाराजी होती. त्याच्यासोबत अनेक आणखी खेळाडू इंडियन प्रीमियर लीगसाठी डोमेस्टिक स्तरावर क्रिकेट खेळत नव्हता. बोर्डाने याबाबत आपली कठोर भूमिका मांडली. आता भारतीय संघातील अधिकतर खेळाडू डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहेत. नुकतीच दिलीप ट्रॉफी २०२४साठी संघ घोषित झाला. यात शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेसह अनेक खेळाडू भाग घेत आहेत.

 

इशानच्या आंतरराष्ट्रीय करिअरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी ३२ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने या दरम्यान ७९६ धावा केल्यात. इशानने २७ वनडे सामन्यात ९३३ धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये दुहेरी शतक ठोकले आहे. इशानने २ कसोटी सामने खेळले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -