Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीखुशखबर! कमी झाली Oneplus 12 ची किंमत, वाचतील तुमचे १० हजार रूपये

खुशखबर! कमी झाली Oneplus 12 ची किंमत, वाचतील तुमचे १० हजार रूपये

मुंबई: चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसकडे साधारण सर्व सेगमेंटमध्ये आपले स्मार्टफोन आहेत. यातच कंपनीने शानदार स्मार्टफोन वनप्लस १२च्या किंमतीमध्ये कपात केली आहे. अशातच जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. खरंतर, या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे याच्या मदतीने तुम्ही फोन खरेदीवर साधारण १० हजारापर्यंत बचत करू शकता.

काय आहे ऑफर

neplus 12 च्या २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रूपये आहे. मात्र ई कॉमर्स फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर तब्बल १४ टक्के डिस्काऊंट ग्राहकांना मिळत आहे. आता या डिस्काऊंटनंतर तुम्ही हा फोन ५५, ४९० रूपयांच्या किंमतीवर खरेदी करू शकता. असे केल्याने तुम्ही फोन खरेदीवर ९२०७ रूपयांची बचत करू शकता.

इतकंच नव्हे तर हा स्मार्टफोन जर तुम्ही HDFC Bank च्या Credit अथवा Debit Cardने खरेदी करत असाल तर तुम्हाला २ हजार रूपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. तर Flipkart Axis Bank Cardच्या मदतीने फोन खरेदी करत असाल तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅकही मिळेल.

Oneplus 12चे फीचर्स

आता Oneplus 12 स्मार्टफोनच्या फीचर्सवर नजर टाकल्यास हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये ६.८२ इंचाचा मोठा डिस्प्ले उपलब्ध केला आहे. हा डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेट देते. सोबतच यात ४५ निट्सचा पीक ब्राईटनेस मिळतो. फोनचा डिस्प्ले Corning Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शनसह येतो. यात Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. यात तुम्हाला १६ जीबी रॅमसह 1TB पर्यंत स्टोरेज मिळतो.

शानदार कॅमेरा सेटअप

स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास कंपनीने ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह ६४ मेगापिक्सेचा टेलिफोटो आणि एक ४८ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड कॅमेरा मिळतो. यात ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -