Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज शुक्रवारी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने भाजप नेत्यांनी त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सदैव अटल येथे पोहोचत माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.


अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्ट २०१८मध्ये दिल्लीमध्ये झाले होते. त्यांचा जन्म १९२४ला ग्वालियरमध्ये झाला होता. पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली श्रद्धांजली


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील समाधीस्थळ सदैव अटल येथे हजेरी लावली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदैव अटल येथे जात माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी अनेकदा आपल्या भाषणादरम्यान अटलजींचा उल्लेख करतात.



एनडीए नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली


केंद्रीय मंत्री आणि एनडीए नेत्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक एनडीएचे नेते सदैव अटल येथे पोहोचले.
Comments
Add Comment