मुंबई: हल्लीच्या काळात खराब लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सातत्याने लोकांमध्ये वाढत आहे. कारण त्यानंतर हॉर्ट अॅटॅकचाही धोका वाढतो.
हाय कोलेस्ट्रॉलमुळे हॉर्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. दरम्यान, खाण्या-पण्याच्या माध्यमातून कोलेस्ट्रॉल बऱ्याच प्रमाणात नियंत्रित ठेवता येतो. लसूण खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यास मदत मिळते.
जेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा हॉर्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी सगळ्यात आधी खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करा. यासाठी काही भाज्या आणि आयुर्वेदिक उपायांना आपल्या दिनचर्येत सामील करा.
यामुळे शरीराला रोगमुक्त बनवण्यासाठी तसेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळेल. आपल्या दिनचर्येत अशा गोष्टी सामील करा जे तुम्ही या जीवनशैलीचा भाग बनवू शकता. यामध्ये लसूण अतिशय फायदेशीर ठरते. तुमच्या खाण्यात कच्च्या लसणीचा समावेश करा.
यामुळे खराब कोलेस्ट्रॉल आणि वाढलेले ट्रायग्लिसराईड अगदी सहज कमी केले जाऊ शकते. लसूण हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते. तुम्ही खाण्यामध्ये लसूणचे प्रमाण वाढवू शकता अथवा लसूणची चटणी, लोणचे यांचा समावेश करू शकता.
सकाळी रिकाम्या पोटी लसूण हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. लसूण अगदी सहज चावून खाता येते. थोडे कडवट लागल्यास त्यावर पाणी पिऊ शकता. या पद्धतीने लसूण खाऊन खराब कोलेस्ट्रॉल कमी केले जाऊ शकते.