मुंबई: १५ ऑगस्ट २०२४ला भारत आपला ७८वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी खास ऑफर्स आणल्या आहेत. यातीलच एक नाव म्हणजे व्होडाफोन-आयडिया. व्हीआयने आपल्या युजर्ससाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही खास प्लान्स सादर केले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या खास ऑफर्स
व्हीआयचे ग्राहक याचे फायदे १३ ऑगस्ट २०२४ पासून ते २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत उचलू शकणार आहेत. व्हीआयने ही ऑफर आपल्या चार प्रीपेड प्लान्समध्ये दिली आहे. या प्लान्सची किंमत १७४९, ३४९९ रूपये, ३६२४ रूपये आणि ३६९९ रूपये आहे. हे सर्व व्हीआयचे लाँग टर्म प्लान्स आहेत. यावर व्हीआय खास ऑफर देत आहेत.
१७४९ रूपयांचा प्लान
या प्लानची व्हॅलिडिटी १८० दिवस म्हणजेच ६ महिन्यांची आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधासह दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. आता स्वातंत्र्यदिनानिमित्त या प्लानसोबत युजरला ३० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळेल.
३४९९ रूपयांचा प्लान
या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा तसेच दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या प्लानसोबत युजर्सला ५० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळेल.
३६२४ रूपयांचा प्लान
या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधासोबत दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. आता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या प्लानसोबत युजर्सला ५० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी ९० दिवसांची असेल. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला ऑफरमध्ये एका वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारचे मोबाईल सबस्क्रिप्शनही फ्रीमध्ये मिळेल.
३६९९ रूपयांचा प्लान
या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. यात युजर्सलाअनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा सोबत १.५ जीबी डेटा मिळतो. आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या प्लानसोबत युजर्सला ५० जीबी अधिक डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी ९० दिवसांची असेल. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला ऑफर म्हणून एका वर्षासाठी Amazon Prime Video चे मोबाईल सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळेल.