Saturday, May 17, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Vinesh Phogat: याचिका फेटाळल्यानंतर विनेश फोगाटची पहिली पोस्ट

Vinesh Phogat: याचिका फेटाळल्यानंतर विनेश फोगाटची पहिली पोस्ट

मुंबई: भारतीय चाहत्यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४नंतर मोठा झटका बसला आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपात्र ठरवल्यानंतर अपील केले होते. विनेशची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. ही याचिका फेटाळल्यानंतर भारताची रौप्य पदकाची आशाही मावळली. आता विनेशने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. या फोटोवर विविध कमेंट्स आल्या आहेत.


विनेशने इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. यात ती इमोशनल दिसत आहे. दरम्यान, विनेशने या फोटोच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नाही. मात्र विनेशचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक चाहत्यांनी कमेंट केले आहे. भारतीय टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राने कमेंटमध्ये लिहिले, तुम्ही इन्स्पायरिंग आहात. तुम्हाला कौतुकाचा हक्क आहे. तुम्ही भारताच्या रत्न आहात. मनिकासह विनेशसाठी अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by Vinesh Phogat (@vineshphogat)





विनेशने सीएएसमध्ये रौप्य पदकासाठी अपील केले होते. मात्र या निर्णयाची तारीख वांरवार पुढे ढकलली जात होती. अखेर बुधवारी निर्णय आला. सीएएसने विनेशची याचिका फेटाळून लावली. विनेशला सुवर्णपदकाच्या लढतीआधी अपात्र ठरवण्यात आले होते. तिचे वजन केवळ १०० ग्रॅम अधिक होते. विनेशने कमीत कमी रौप्य पदक निश्चित केले होते. मात्र अपात्र ठरवल्यानंतर तिने निवृत्तीची घोषणा केली होती.


विनेशने कॉमनवेल्थ गेम्समध्ये ३ सुवर्णपदके जिंकली आहे. २०१४, २०१८ आणि २०२२मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सोबतच आशियाई गेम्स २०१८मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

Comments
Add Comment