Sunday, March 16, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीकनोजी ब्राह्मणावर स्वामी प्रसन्न

कनोजी ब्राह्मणावर स्वामी प्रसन्न

समर्थ कृपा – विलास खानोलकर

मुंबईचे गोविंदराव उत्तर हिंदुस्थानातील कनोजी ब्राह्मणासह गाणगापूरला आले. तेथे उपोषणे करीत असता त्यांना दृष्टांत झाला की, ‘आपण प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोटमध्ये आहोत, तेथे तू जा म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल.’

दृष्टांतानुसार ते दोघे अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन ते सेवा करू लागले. श्री स्वामी समर्थांस नैवेद्य दाखवावा; मग त्यांनी जेवावे, असा त्यांचा सेवेचा क्रम पाच महिने चालू होता. असेच एके दिवशी श्री स्वामी समर्थांकडे त्यांनी नैवेद्य नेला असता, श्री स्वामी महाराज म्हणाले, ‘जाओ गाव के बाहेर मज्जीद में, एक फकिर और कुत्ता है, उनको खिलाव.’ त्याप्रमाणे ब्राह्मण गावाबाहेरील फकिराकडे आला. कुत्रा त्याच्याजवळ होताच. ब्राह्मणास पाहून फकीर म्हणाला, ‘तुम्हाला स्वामींनी पाठवले आहे का? तर इकडे या’ असे म्हणून त्यांच्याजवळील नैवेद्याचे ताट घेऊन फकिराने व कुत्र्याने तो नैवेद्य भक्षण केला. थोडा वडा व खीर त्या नैवेद्याच्या ताटात तशीच ठेवून ते ताट फकिराने ब्राह्मणास परत दिले.

ब्राह्मण ताटातील तो प्रसाद घेऊन श्री स्वामी महाराजांकडे आला. श्री स्वामींनी तो प्रसाद त्या उभयंतास खाण्यास सांगितले. गुरुवाक्य प्रमाण समजून ब्राह्मणाने तो प्रसाद भक्षण केला. गोविंदरावाच्या मनात मात्र तो मुसलमानने उष्टावलेला प्रसाद कसा खावा, अशी शंका आल्यामुळे त्यांनी प्रसाद खाल्ला नाही. श्री स्वामी महाराज त्या कनोजी ब्राह्मणावर प्रसन्न होऊन त्याला मुंबईला जाण्याची आज्ञा दिली. गोविंदरावावर रागावून श्री स्वामी समर्थ म्हणाले, ‘तुझी भक्ती अद्याप कच्ची आहे. आणखी सेवा करावी’ असे सांगून त्यास सेवेसाठी स्वतःच्या पादुका घेऊन जाण्याची आज्ञा दिली.

स्वामी गुरुकृपा

गोविंद नामे देवभोळा ब्राह्मण
मित्र विद्वान कनोजी ब्राह्मण।। १।।
दोन्ही पातले गाणगापूर
मनात दत्तभक्तीचाच मोठापूर ।। २।।
स्वामी अवतरी स्वप्नचूर
भक्ताचा ओळखून भक्तीनूर ।। ३।।
स्वामी वदे ‘मी अक्कलकोटी’
मनोकामना होई पूर्ण भक्ती पोटी।।४।।
अक्कलकोटी स्वामींना दिला प्रसाद
देते! ताटकुत्रा व फकिराला प्रसाद।।५।।
स्वामी इच्छेप्रमाणे दिधले ताट फकीर
थोडी खीर दिले परत फकीर ।। ६।।
स्वामी म्हणे उरलेला खा तुम्ही प्रसाद
कनोजीयाने खाल्ला
पटकन प्रसाद ।।७।।
किंतु गोविंदरावे नाकारला प्रसाद
कुत्रा फकीराचे उष्टे, कसा तो प्रसाद?।। ८।।
कनोजीयावर स्वामी झाले प्रसन्न
‘मुंबई में तुममपर १० हजार होंगे प्रसन्न’।। ९।।
गोविंदावर झाले अपूर्ण प्रसन्न
तुझी भक्ती कच्ची म्हणून अप्रसन्न।।१०।।
तुजला देतो मज पादुका
काढ अप्रसन्नता खा मनुका ।। ११।।
मुंबईस त्वरित कनोजीयास प्रसन्न
१० हजार दिधले, मारवाडी पत्नी प्रसन्न।। १२।।
गोविंदरावे स्वामी नंतर प्रसन्न
काही वर्षांत इच्छापूर्ण मन प्रसन्न ।।१३।।
ठेवा स्वामीवर थोडी श्रद्धा
स्वामी चालवती संकटावर गदा।।१४।।
स्वामी चालवीती
आयुष्याची सभा
भिऊ नको स्वामी
पाठीशी उभा ।।१५।।

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -